संध्याकाळच्या चहासोबत काही चटपटीत खाण्याचा विचार करत असाल तर ब्रेड पकोडा बेस्ट ऑप्शन आहे. ब्रेड पकोडाची ही रेसिपी बटाटे आणि अनेक मसाले घालून बनवली जाते. गरमा गरम ब्रेड पकोडे चहासोबत खायला खूप चविष्ट लागतात. तुम्ही हे इव्हनिंग स्नॅक्स म्हणून तर खाऊ शकता, चला तर मग आज ब्रेड पकोडा बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.
साहित्य
२ उकडलेले बटाटे
१ चमचा जिरे
१ चमचा धने
४ ब्रेड स्लाइस
२ कप बेसन
२ चमचे आमचूर पावडर
२ चमचे तिखट
गरजेनुसार हिरवी मिरची
१ टीस्पून ओवा
कोथिंबीर
१/२ इंच आले
चवीनुसार मीठ
कृती
पकोडा बनवण्यासाठी सर्वप्रथम कढई गरम करून त्यात धणे, जिरे २ ते ३ मिनिटे भाजून घ्या आणि ग्राइंडरमध्ये ठेवून बारीक पावडर करा. आता त्याच कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेले आले आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून चांगले मिक्स करा. आता त्यात लाल तिखट, आमचूर पावडर, जिरे आणि धणे पूड घालून चांगले मिक्स करा. आता उकडलेला बटाटा हाताने कुस्करून घाला.आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
यानंतर दुसऱ्या भांड्यात बेसन, ओवा, लाल तिखट आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ तयार करा. पीठ तयार झाल्यानंतर ५ ते ७ मिनिटे बाजूला ठेवा. तुम्हाला हवं असेल तर बेसनाच्या पिठात थोडं पाणी घालून पातळ करू शकता. पण खूप पातळ करु नका. यानंतर ब्रेड स्लाइसमध्ये वरील मिश्रण घालून चांगले पसरवा. त्यानंतर त्यावर ब्रेडचा दुसरा स्लाइस ठेवा आणि तो चांगला दाबा. आता ब्रेडचे तुकडे बेसनाच्या पिठात बुडवून तळून घ्या. तुमचा चविष्ट स्ट्रीट स्टाइल ब्रेड पकोडा तयार आहे. गरमा गरम ब्रेड पकोडे सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









