आंबा हे फळ आवडत नाही असा कोणतरी एखादा सापडेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आंबा आवडतो.पण आंब्याचा सीझन उन्हाळ्यामध्ये असल्याने वर्षभर आंब्याची चव चाखता यावी यासाठी आंब्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. आज आपण घरच्या घरी गुळंबा कसा बनवायचा हे जाणून घेऊयात.
साहित्य
कैरीचा किस – २ वाट्या
गूळ किंवा साखर – २ वाट्या
वेलची पावडर – पाव चमचा
मीठ – पाव चमचा
तूप – २ चमचे
कृती
सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करुन घ्याव्यात.नंतर किसणीने कैरी किसून घ्यावी. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तूप घालून किसलेली कैरी घालावी.त्यामध्ये त्याच प्रमाणात गूळ किंवा साखर घालावी. हे मिश्रण चांगले हलवून एकजीव करावे आणि अंदाजे पाणी घालून ७ ते ८ मिनीटे शिजू द्यावे. त्यानंतर यामध्ये वेलची पूड आणि चवीपुरते मीठ घालावे. पाक आणि कैरीचा किस एकजीव होत आले की गॅस बंद करावा. गार झाल्यावर हा गुळांबा किंवा साखरांबा कोरड्या केलेल्या बरणीत काढून ठेवावा. जास्त कैऱ्यांचा करणार असाल तर फ्रिजमध्ये ठेवलेला केव्हाही चांगला कारण जास्त तापमानामुळे तो खराब होण्याची शक्यता असते.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









