Rava Cake Recipe : अनेकांना चहासोबत ब्रेड, बटर, टोस्ट खाण्याची सवय असते. तर काहींना केक देखील खायला आवडतो. तुम्हाला जर घरच्या घरी केक बनवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला रवा केक कसा बनवायचा हे सांगणार आहोत. अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी केक बनवण्याची टिप्स चला जाणून घेऊया.
साहित्य
साखर- 1 कप (मिक्सरमधून बारीक करून घेणे)
दही-पाव कप
रवा-सव्वा कप ( 1 पूर्ण कप आणि पाव कप रवा)
फ्रेश क्रिम-अर्धा कप
दूध – अर्धा कप
मीठ -चवीपुरत
बॅटर कसे बनवायचे
यासाठी सुरुवातील फ्रेश क्रिम आणि दही मिक्स करून घ्या. आता त्यात बारीक वाटलेली साखर घाला. पुन्हा या मिश्रणात रवा आणि 2 चमचे दूध घाला आता चिमुठभर मीठ घाला. हे सर्व मिश्रण चांगेल मिक्स झाले की अर्धा तास भिजत ठेवा.
कृती
सुरवातीला मध्यम गॅसवर कढई तापत ठेवा. त्यात एक छोटस स्टॅड ठेवा. भिजलेला रवा घ्या. रवा भिजून घट्ट होतो. त्यामुळे यामध्ये थोडे दूध घालून मिक्स करा. आता यात एक टिस्पून बेकिंग पावडर घाला. अर्धा टिस्पून बेकिंग सोडा घाला. पाव चमचा व्हेनिला इन्सेंस घाला.हे सर्व मिश्रण मिक्स करुन घ्या.यानंतर केकच्या भांड्याला बटर पेपर लावून घ्या.आता तापलेल्या कढईत हे भांडे ठेवा. 35 ते 40 मिनिट हे भांडे झाकण ठेवून द्या.गॅस मध्यम आचेवर ठेवा. 40 मिनिटांनी केक तयार झाला हे चेक करा. नसेल तर अजून 5 ते 10 मिनिट केक शिजवा.केक तय़ार झाल्यानंतर कढईतून काढून घ्य़ा. आता त्याच्यावर एक सॉफ्ट कापड ठेवून पूर्ण थंड करून घ्या.केक थंड घाला की केक सर्व्ह करा.