चिपळुणातील प्रचार रॅलीत अभिनेते ओंकार भोजने यांचे मतदारांना आवाहन, मतदान हक्क बजावण्याची साद
चिपळूण :
आमदार शेखर निकम यांचे सर्व क्षेत्रातील काम आपणा सर्वांना माहित आहे. त्यामुळे काम करणाऱ्या आपल्या हक्काच्या शेखर निकम यांनाच पुन्हा आमदार करा. असे आवाहन अभिनेते ओंकार भोजने यांनी मतदारांना केले. तसेच मतदानाचा हक्क बजावण्याची साद घातली.
महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ रविवारी शहरातून प्रचार रॅली काढण्यात आली. सायंकाळी ६ वाजता शहरातील वेस मारूती मंदिर येथे अभिनेते भोजने यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, शेखर निकम यांनी सर्व क्षेत्रांमध्ये मोठे काम केले आहे. रात्री-अपरात्री कधीही दूरध्वनी केल्यास ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे अशा हक्काच्या माणसांना मतदान करून पुन्हा आमदार करणे हे आपले – सर्वांचे कर्तव्य आहे. निवडणुकीत सर्वांनी वेळ काढून खूप मतदान करा अशी सादही भोजने यांनी मतदारांना घातली.








