modak recipe : आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे.म्हणूनच आज आपण बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकाची रेसिपी पाहणार आहोत. जी झटपट आणि स्वादिष्ट देखील आहे. गणेशाच्या आगमनावेळी घरी पूजेची गडबड सुरु असते तेंव्हा बाप्पाच्या नैवैद्यासाठी तुम्ही हे मोदक झटपट तयार करू शकता.
रवा नारळ मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
१ कप रवा
३ चमचे तूप
१ कप ओल्या नारळाचा कीस
केशर
१ कप साखर
दीड कप दूध
ड्रायफ्रूट्स
वेलदोडे
कृती :
प्रथम एका कढई मध्ये ३ चमचे तूप घाला.तूप वितळल्यानंतर यामध्ये १ कप रवा घाला.आणि ५ ते ६ मिनिटे भाजून घ्यावा. यानंतर यामध्ये एक कप ओल्या नारळाचा कीस आणि एक वाटी साखर घालून पुन्हा एकदा मंद आचेवर हा रवा भाजून घ्यावा. नंतर केशरकांड्या घातलेले २ चमचे दूध यामध्ये घालावं,यामुळे मोदकांना रंग छान येतो. तयार झालेल्या मिश्रणात काजू बदामाचे किंवा पिस्त्याचे काप घालावे आणि नंतर यात दीड काप दूध घालावं . मिश्रणात गुठळी राहणार नाही याची काळजी घ्या आणि यावर झाकण ठेवून वाफवून घ्यावं. गॅस बंद करून त्यात वेलची घाला. आणि मिश्रण थोडं थंड करत ठेवा. मोदकाच्या साच्याने हे मोदक बनवून घ्या.झटपट आणि स्वादिष्ट मोदक बाप्पांच्या नैवेद्यासाठी तुम्हीही तयार करू शकता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









