दिवसाची सुरवात ही सकाळच्या नाश्त्याने होते. अशावेळी हा नाश्ता चविष्ट तर हवाच शिवाय पौष्टिक देखील असायला हवा.पोहे, उपमा,इडली,डोसा यांसारखे पदार्थ तर आपण नेहमीच खात असतो. पण आज आपण झटपट होणारे आणि पौष्टिक असणारे ओट्सचे आप्पे कसे बनवतात हे आज जाणून घेणार आहोत. हा नाश्ता तुम्ही चहा आणि कॉफीसोबत सहज घेऊ शकता. मुलांनाही ही रेसिपी खूप आवडेल. चला, जाणून घेऊया त्याची रेसिपी
साहित्य
ओट्स पावडर – १ वाटी
उडदाची डाळ – १ वाटी
मीठ
बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी
किसलेले गाजर – २ चमचे
बारीक चिरलेली शिमला मिर्ची – पाव वाटी
तेल
कृती
सकाळी नाश्ता करण्यासाठी रात्री उडीद डाळ भिजत घाला.यानंतर सकाळी भिजवलेली उडीद डाळ घ्या आणि गुळगुळीत होईपर्यंत मिक्सर मध्ये बारीक करा. त्यात ओट्स पावडर, चवीपुरते मीठ घाला.आणि ते चांगले मिक्स करा.मिश्रण घट्ट वाटत असेल तर त्यात थोडे पाणी घालावे. यानंतर त्यात चिरलेला कांदा, गाजर आणि सिमला मिरची घाला.आता आप्पे मेकर घ्या आणि तेलाने चांगले ग्रीस करा. हे मिश्रण तेल लावलेल्या तव्यामध्ये पळीने ओता आणि झाकण लावून शिजू द्या. दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन झाल्यावर बाहेर काढा. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर भाज्याही टाकू शकता.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









