Nails Shiny And Healthy: चमकदार आणि स्वच्छ नखे हातांचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. लांब गुलाबी रंगाची तसेच आकर्षक रंगाची नेलपेंट नखांचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. मात्र कधी नखे व्यवस्थित साफ न करणे, सकस आहार न घेणे, केमिकल नेलपेंट वापरणे यामुळे नखे पिवळी पडू लागतात.नखे पिवळी झाली की त्याचे सौंदर्य कमी होवू लागते. पिवळी नखे असण्यामागे अनेक कारणे असतात. मात्र वेळीच खबरदारी घेतली तर नखे पिवळी पडत नाहीत. यासाठी तुमच्या आहारात झिंक आणि बायोटिनचा समावेश करू शकता. यामुळे नखे फक्त मजबूत बनत नाही तर त्यांना चमकदार देखील बनवू शकतात.
सकस आहार-
नखे निरोगी, मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात झिंक आणि बायोटिन समाविष्ट करू शकता. यामुळे नखे फक्त मजबूत मजबूत बनत नाही तर त्यांना चमकदार देखील बनवू शकतात.
लिंबू-लिंबूमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असते. नखांना चमकदार बनवण्यासाठी तुम्ही लिंबू पिळून त्याच्या पाण्याने नखे चोळा किंवा अर्धा लिंबू घेऊन नखांवर चोळा.यामुळे नखे साफ होतील शिवाय नखांचा पिवळापणा कमी होतो.
व्हिटॅमिन ई-
व्हिटॅमिन ई आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमची नखे पिवळी झाली असतील तर तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन ई असलेले पदार्थ समाविष्ट करू शकता. याशिवाय व्हिटॅमिन ई तेलाच्या कॅप्सूलने नखांची मसाज करू शकता.यामुळे देखील तुमची नखे पिवळी होण्यापासून बचाव होऊ शकतो.
टीप– पिवळी नखे ही आहारातील कमतरतेमुळे पिवळी पडतात. तुम्हाला घरगुती उपायाने पिवळेपणा कमी नाही झाला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









