आजचा फास्टफूडचा जमाना आहे. प्रत्येकालाच पिझ्झा, बर्गर ,सँडविच असे चवीला टेस्टी पण पौष्टिक नसणारे पदार्थ खाण्याची सवय लागलीय आहे.पण हेच पदार्थ तुम्ही घरच्या घरी बनवू शकता.आणि जे पौष्टिक देखील असतील. आज आम्ही तुम्हाला अशा फ्रेंच टोस्टची रेसिपी सांगत आहोत, ज्यामध्ये अंड्यांसोबत काही मसाले, एक-दोन भाज्याही लागतात. या रेसिपीचे नाव मसाला फ्रेंच टोस्ट आहे.हा टोस्ट कसा बनवायचा हे जाणून घेऊयात.
साहित्य
ब्रेडचे स्लाईस
अंडी – २
तेल किंवा बटर
कांदा – १ लहान
टोमॅटो – १ लहान
दूध – १/२ कप
हिरवी मिरची – २
कोथिंबीरची पाने – बारीक चिरून
चाट मसाला – १/२ टीस्पून
मीठ – चवीनुसार
लाल तिखट – अर्धा टीस्पून
काळी मिरी पावडर – अर्धा टीस्पून
कृती
मसाला फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या सर्व भाज्या बारीक चिरून घ्या.ते एकत्र मिसळा.सर्व ब्रेड स्लाइस त्रिकोणी आकारात कापून घ्या.आता एका भांड्यात अंडी घालून फेटून घ्या.त्यामध्ये तिखट,काळी मिरी पावडर आणि मीठ असे सर्व मसाले घालून मिक्स करा.नंतर त्यात दूध घालून फेटून घ्या.गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात थोडे तेल किंवा बटर घाला.अंड्याच्या मिश्रणात एक ते दोन ब्रेडचे तुकडे बुडवून गरम पॅनमध्ये ठेवा.दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या.आता ते सर्व टोस्ट एका प्लेटमध्ये काढा.आणि सर्व स्लाइसवर चिरलेला कांदा आणि टोमॅटोचे मिश्रण ठेवा. वर चाट मसाला टाका. तुम्ही वरून कोथिंबीरही टाकू शकता.हा पौष्टिक मसाला फ्रेंच टोस्ट खाण्याचा आनंद घ्या. टोमॅटो सॉस किंवा कोथिंबीर चटणी सोबत पण सर्व्ह करू शकता.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









