जन्मजात विकलांग फुलराणी किनळेकर यांची आर्त हाक : जिद्दीने घेतले 12 वी पर्यंत शिक्षण : केंद्रीय मानव अधिकार संघटना यांनी आयोजित कार्यक्रात व्हीलचेअर, कृत्रिम पाय प्रदान
पेडणे : विकलांग म्हटल्यानंतर सहानुभूती दाखवत मदतीचे हात सरसावतात. आपण विकलांक आहे. आपकडूक काही होणार नाही, सगळ्या आकांक्षा गमावून केवळ सहानुभूतीवर जगणारे अनेक जण आहेत. परंतु, आपल्या विकलांग अवस्थेवर मात करत कोनाडी कोरगाव येथील फुलराणी किनळेकर हिने बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पूर्णपणे जन्मताच नियतीने हातपाय हिरावून घेतले. तिला आपल्या अपंगत्वावर मात करण्यासाठी स्वावलंबी बनायचे आहे. सक्षम बनवण्यासाठी मला सरकारने नोकरी द्यावी, अशी आर्त फुलराणी हिने कोरगाव येथील एका कार्यक्रमात दिली. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी प्रयत्न करून सरकारच्या माध्यमातून आपणास नोकरी मिळावून द्यावी. अशी मागणी फुलराणी किनळेकर हिने यावेळी केली कोरगाव येथील श्री कमलेश्वर सभागृहामध्ये केंद्रीय मानव अधिकार संघटना यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुलराणी हिने आपली व्यथा मांडली. या कार्यक्रमात फुलराणी किनळेकर हिला अत्याधुनिक व्हीलचेअर आणि कृत्रिम पाय प्रदान केला. यावेळी व्यासपीठावर भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे स्थानिक आमदार प्रवीण आ, केंद्रीय मानव अधिकार संघटनचे केंद्रीय अध्यक्ष मिलिंद दहिवाले, राज्यप्रमुख डॉ. सुरज बेहेरे ,महिला अध्यक्ष सीमा बेहरे, कोरगाव सरपंच समील भाटलेकर, पंच अनुराधा कोरगावकर, पंच नेता नर्से, पंच दिवाकर जाधव, ज्योती शेटगावकर, सिंधुदुर्गचे प्रमुख अजित सुभेदार, महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर ज्योती, गुरव सत्तरी अध्यक्ष देविदास गावकर उपस्थित होते. निकिता मांजरेकर, गीता आदींनी सूत्रसंचालन केले.
अपंग असलेली फुलराणी हिला फरीदा बांदेकर यांच्यामार्फत अत्याधुनिक चेअर तर स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यामार्फत कृत्रिम पाय प्रदान करण्याचा सोहळा यावेळी भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यामार्फत करण्यात आला. जन्मताच दोन्ही हात, दोन्ही पाय नाही, देवाला दोष न देता, नशिबाला दोष न देता जिद्दीने आई-वडिलांनी बारावीपर्यंत फुलराणी हिला शिक्षण दिले. त्या शिक्षणाच्या बळावर आपण ओल्ड गोवा येथील एका स्कूलमध्ये शिक्षादानाचं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर काम केले. कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आपण घरी आले. घरी संगणक ज्ञान मिळवलं ,युट्युब मार्फत डिझाईन शिलाई मशीन कशा पद्धतीने चालवायचं याचं प्रशिक्षण घेऊन कलात्मक गुणांना वाव दिला. आता आपल्याला स्वावलंबी बनायचं आहे. कुणावर अवलंबून न राहता स्वत:च्या पायावर स्वत:च्या जिद्दीने मला पैसे कमवायचे आहेत. त्यासाठी सरकारने मला नोकरीची संधी दिल्यास आपल्या आयुष्याचे सोने होईल, अशी कैफियत यावेळी फुलराणी किनलेकर हिने मांडली.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नोकरी देणार : तानावडे
भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी जान्मजात विकलांग असलेल्या फुलराणी किनळेकर हिची कैफियत ऐकली. ज्या पद्धतीने अपंगत्वावर मात करत फुलराणी हिने स्वावलंबी आयुष्य जगण्याची जिद्द ठेवून नोकरीची मागणी केली आहे. त्याची आपण नक्कीच दखल आपण घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वेगवेगळ्या उपक्रमात एखादी जरी रोजगाराची संधी उपलब्ध असणार आहे. त्या ठिकाणी फुलराणी किनळेकर हिला सामावून घेत नोकरी देण्यासाठी r आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी नक्कीच चर्चा करू, असे आश्वासन यावेळी तानावडे यांनी दिले.
फुलराणीला नोकरी मिळून देणारच : आमदार आर्लेकर
अपंगत्वावर मात करणाऱ्या फुलराणी किनळेकर हिच्या जिद्दीला सलाम करत असून तिला स्वावलंबी बनविण्याचे विडा आपण उचलत आहे. तिचे पुढील जीवन आणि चांगल्या पद्धतीने तिचं भवितव्य घडवावं यासाठी आपण तिला नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून सर्वतोपरी मदत करण्याचा आपला मनोदय असल्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी यावेळी व्यक्त केला. मानव अधिकार संघटनेकडून एका चांगल्या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आमदार प्रवीण आर्लेकर यांनी समाधान व्यक्त केले. केंद्रीय मानव अधिकार संघटन केंद्रीय अध्यक्ष मिलिंद दहिवाले यांनी या संघटने विषयी देशात कशा पद्धतीने कार्य सुरू आहे. याची माहिती दिली. दिल्ली येथे मुख्य कार्यालय त्याचप्रमाणे नागपूर येथे एक विस्तारित कार्य कार्यालय आहे गोव्यातही असं कार्यालय लवकरच सुरू केले जाईल, असे ते म्हणाले.









