रेस्टोरंट स्टाईल लच्छा पराठा सर्वानाच आवडतो.कोणत्याही भाजीसोबत हा पराठा स्वादिष्ट लागतो.पण घरच्या घरची देखील हा पराठा बनवता येतो.
जर तुम्ही घरी पार्टी करण्याचा विचार करत असाल तर हा पनीर,दाल मखनी किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीसोबत हा स्वादिष्ट पराठा सर्व्ह करू शकता. चला तर मग आज जाणून घेऊयात हा पराठा कसा बनवायचा.
साहित्य
२ वाट्या मैदा
साखर – एक चमचा
पाणी
तेल – एक चमचा
मीठ
तूप
कृती
सर्वप्रथम एक मोठा बाऊल घ्या आणि त्यात मैदा, मीठ, साखर आणि तेल मिक्स करा. मैद्याच्या जागी तुम्ही गव्हाचे पीठ देखील घेऊ शकता. नंतर थोडे पाणी घालून गुळगुळीत पीठ मळून घ्या. ओल्या कापडाने झाकून ३० मिनिटे बाजूला ठेवा. यांनतर पीठाचे ४ समान भाग करून त्याचे गोळे बनवा. एका गोळ्यावर थोडे पीठ गुंडाळून चपाती लाटावी. चपातीला थोडे तूप लावून त्यावर थोडे पीठ शिंपडा. आता बोटांच्या मदतीने फोल्ड करून प्लीट्स बनवा. प्लीटेड पीठ मळून घ्या. स्विस रोल प्रमाणे प्लीटेड पीठ लाटा. दरम्यान, नॉन-स्टिक पॅन मध्यम आचेवर ठेवा. आता एक स्विस रोल आकाराचा गोळा घ्या आणि थोडे कोरडे पीठ घ्या. लाटण्याने गोळ्याला गोलाकार पराठ्यात लाटून घ्या. नॉन-स्टिक तवा गरम झाल्यावर त्यावर लाटलेला पराठा ठेवा. आणि दोन्ही बाजूला तूप लावून भाजून घ्या. तयार झालेला गरमागरम पराठा तुमच्या आवडीच्या कोणत्याही ग्रेव्ही असणाऱ्या भाजीसोबत सर्व्ह करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









