कोजागिरी पौर्णिमा म्हंटल की घरोघरी मसाला दुधाचा बेत केला जातो. कोजागिरी च्या चांदण्यात बसून सर्वजण सुगंधी दुधाचा आस्वाद घेतात. पण हे मसाला दूध तयार करण्यासाठी बऱ्याच वेळेला विकतचा मसाला आणला जातो.आणि तो महाग ही मिळतो.म्हणूनच आज आपण हा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा हे जाणून घेऊयात.
साहित्य
१ लिटर म्हशीचं दूध
१/४ कप साखर
१०~१२ केशराच्या काड्या
पिस्त्याचे काप
चिमूटभर हळद
दुधाचा मसाला
१० काजू
१० बदाम
१० पिस्ते
६ वेलची
छोटा जायफळाचा तुकडा
सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात दूध घ्या. त्यामध्ये पाव कप साखर आणि १०-१२ केशराच्या काड्या घालून दूध गॅसवर मंद आचेवर उकळत ठेवा.(आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता)आणि तोपर्यंत साईडला दुधाचा मसाला तयार करून घ्यावा. मसाला तयार करण्यासाठी एका पॅन मध्ये १० काजू, १० बदाम आणि १० पिस्ते हलकेसे भाजून घ्यावेत.आणि गॅस बंद करावा. गरम पॅनमधेच वेलची सोलून घालावी. यामुळे मसाल्याला वेलचीचा छान स्वाद येतो. नंतर यामध्ये छोटा जायफळाचा तुकडा टाकून सर्व पदार्थ बारीक वाटून घ्यावेत.दूध थोडं दाटसर होण्यासाठी तुम्ही त्यामध्ये पाव वाटी दूध पावडर ही घालू शकता. यानंतर दुधाला छान रंग येण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी.हळद औषधी तर आहेच शिवाय यामुळे दुधाला नैसर्गिक रंग प्राप्त होतो. दूध मंद आचेवर उकळत असताना त्यामध्ये तयार केलेला मसाला घालावा.आणि पुन्हा एकदा एक उकळी काढावी.तयार झालेलं गरमागरम मसाला दूध कोजागिरीच्या चांदण्यात सर्वाना सर्व्ह करा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









