Nankatai Recipe: लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही नानकटाई आवडते.पण आज आपण बाजारात मिळणाऱ्या नानकटाईप्रमाणे घरच्या घरी कढईमधे खुसखुशीत नानकटाई कशी करायची ते पाहणार आहोत. याची रेसिपी झटपट आणि सोपी देखील आहे.
नानकटाईसाठी लागणारे साहित्य
मैदा 1 कप ( 125 gram )
तुप 1/2 कप
पिठ्ठी साखर 3/4 कप
बेसनाचे पीठ 2 टे स्पून
बारीक रवा 2 टे स्पून
बेकींग पावडर 1/2 टी स्पून
बदाम आणि पिस्त्याचे तुकडे /टुटी फ्रुटी
कृती
सर्वप्रथम एका मोठ्या बाऊल मध्ये अर्धा कप तूप घ्या. यामध्ये पाऊण कप पिठ्ठी साखर घालून चमच्याने चांगलं फेटून घ्यावं. (साखर तुम्ही चवीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता.) यांनतर यामध्ये एक कप मैदा,२ चमचे बेसन पीठ आणि २ चमचे बारीक रवा चालून घालावा. (चालून घेतल्याने सर्व पीठ एकजीव होत.) नंतर यामध्ये अर्धा टी स्पून बेकिंग पावडर घालून सर्व मिश्रण हलक्या हाताने मळून घ्यावं. पीठ थोडं कोरडं वाटल्यास त्यात तूप आणखी घालून मळून घ्या. यानंतर गॅस वर कढई मध्ये एक स्टॅन्ड ठेवून झाकण लावून प्री हिट साठी ठेवावी. तयार केलेल्या पिठाचे बिस्कीट सारखे गोल आकार करून घ्यावेत. आणि त्यावर बदाम किंवा पिस्त्याचे काप लावावेत. (तुमच्या आवडीचे कोणतेही ड्राय फ्रुट्स इथे लावू शकता) यांनतर एका प्लेट ला तूप लावून त्यावर ही नानकटाई ठेवावी.यांनतर ही प्लेट कढई मधील स्टॅन्ड वर ठेऊन झाकण ठेवावं. आणि २० -२५ मिनटं मंद आचेवर बेक करून घ्यावी.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









