आपण घरी आइसक्रीम, फ्रूट सॅलड, निरनिराळे फ्रुट ड्रिंक्स बनवतो. पण आज आपण एक खूप छान डेझर्ट बनवणार आहोत.छोट्या पार्टीसाठी किंवा आपल्याला घरी झटपट करता येते. व बनवायला पण अगदी सोपे आहे. चला तर पाहुयात हे फ्रुट कस्टर्ड कसे बनवतात.
साहित्य
१/२ लिटर दुध
३ चमचे कस्टर्ड पावडर
२ चमचे साखर
३-४ थेंब व्हॅनिला इसेन्स
फळे (द्राक्ष,डाळिंब, सफरचंद, चिकू )
कृती
सर्वप्रथम आवडीनुसार फळे स्वछ धुवून घ्या. आता फळांचे बारीक तुकडे करून घ्या. फ्रुट कस्टर्ड बनवण्यासाठी सुरुवातीला १ कप दुधात कस्टर्ड पावडर, साखर मिक्स करून घ्या. बाकीचे दुध गरम करून त्यामध्ये कस्टर्ड पावडरचे दुध हळू-हळू मिक्स करा. मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद विस्तवावर हलवत रहा. आता मिश्रण घट्ट झाले की फ्रिजमध्ये थंड करायला ठेवा. सर्व्ह करताना फळांचे तुकडे त्यामध्ये मिक्स करा. वरून स्ट्बेरी सॉसने सजवून मग थंड फ्रुट कस्टर्ड सर्व्ह करा.