हिवाळ्यात त्वचेसोबत ओठांची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण थंडीमुळे ओठ ड्राय होतात. अनेकदा ओठ फाटू लागतात.किंवा काळे पडू लागतात.अशावेळी लीप बाम आणि लीप केअर लावला जातो.पण जर घरीच सोप्या पद्धतीने लिप बाम तयार करता आला तर त्याचे साईड इफेक्टस ही जाणवणार नाहीत. याशिवाय याचा चांगला फायदा होऊ शकतो.आज आपण सोप्या पद्धतीने लिप बाम कसा तयार करू शकता ते जाणून घ्या.
लीप बाम बनवण्यासाठी साहित्य
1/4 कप – बी वॅक्स
2 चमचे – खोबरेल तेल
1 चमचा – ऑलिव्ह ऑइल
1/4 कप – वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या
1/2 चमचा – व्हॅनिला अर्क
1/4 चमचे मध
कृती
सर्वप्रथम एका कढईत १ ग्लास पाणी उकळत ठेवा. आणि त्यामध्ये एक स्टॅन्ड ठेवा यांनतर एका छोट्या भांड्यात बी वॅक्स, खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑइल हे सर्व एकत्र करा आता हे भांडे कढईतील स्टॅन्ड वर ठेवून द्या. भांड्यातील मिश्रण वितळयानानंतर भांडे बाजूला काढून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घाला, ज्यामुळे पाकळ्यांचे नैसर्गिक तेल आणि सुगंध सुटतो. तसेच त्यामध्ये व्हॅनिला अर्क आणि मध घाला. आणि मिश्रण एकत्र करून घ्या.त्यांनतर हे मिश्रण एका छोट्या डबी मध्ये घालून ४ ते ५ तास फ्रीझमध्ये ठेवा.मिश्रण पूर्णपणे सेट झाल्यावर फ्रीजमधून बाहेर काढा.तयार झालेला दिवसातून ४ ते ५ वेळा हा लीप बाम तुमच्या ओठांवर वापरू शकता.असे केल्याने ओठांना थंडावा तर मिळेलच पण कोरड्या ओठांच्या समस्येपासूनही सुटका मिळेल.हा लिपबाम हा घट्ट झाकणाच्या डबीमध्ये ठेवावा जेणेकरून ओलावा आत जाणार नाही. अन्यथा, लिप बाम खराब होण्याची शक्यता असते. गुलाबाची पाने ओठांना गुलाबी करण्यासाठी मदत करू शकतात. याशिवाय खोबरेल तेलामध्ये अँटीफंगल गुणधर्म असतो ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून ओठांचे संरक्षण करते .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









