चॉकलेट सँडविच ही मुलांची आणि चॉकलेट प्रेमींची नेहमीच आवडती रेसिपी आहे. हे नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणाच्या वेळी नाश्ता म्हणूनही मुलांना देता येते. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चॉकलेट आणि झटपट तुम्ही हे बनवू शकता. आज आपण जाणून घेऊयात चॉकलेट सँडविच कसं बनवायचं.
साहित्य
१०० ग्रॅम डार्क चॉकलेट
१ चमचा बटर
ब्रेड स्लाइसेस
पिस्ता,बदाम आणि काजूचे बारीक काप
कृती
सर्वप्रथम एका कढईत पाणी उकळण्यासाठी ठेवा. नंतर त्यामध्ये एक स्टॅन्ड ठेवून एका भांड्यात डार्क चॉकलेट वितळवण्यासाठी ठेवा.आता ब्रेडचा एक स्लाईस घ्या, त्यावर बटर लावा आणि त्यावर वितळलेल्या चॉकलेटचा जाड थर पसरवा आणि त्यावर ब्रेडवर चिरलेला पिस्ता, चिरलेला बदाम आणि काजू घाला.यानंतर ब्रेडचा दुसरा स्लाईसला बटर लावून त्याच्या वर ठेवा आणि सँडविच कुरकुरीत होण्यासाठी बाहेरील ब्रेडच्या बाजूसही थोडे बटर लावा.आता ग्रिल पॅन गरम करा आणि त्यावर सँडविच ठेवा,दोन्ही साईडने सँडविच सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. गरमागरम आणि टेस्टी सँडविच सर्व्ह करा.
Previous Articleपुलवामात दहशतवादी कट उधळला; 5 ते 6 किलो आयईडीसह एकाला अटक
Next Article उन्हाळ्यात ट्राय करा बडीशेपचं सरबत









