दिवाळीत नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. पूर्वीच्या काळी घरच्या घरी पारंपारिक पद्धतीने उटणं तयार केलं जायचं. मात्र,अलीकडे लोक बाजारातून उटणं खरेदी करतात.परंतु त्यात भेसळही असू शकते. यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते. यामुळे या दिवाळीत बाजारातून उटणे विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी स्वच्छ आणि सुवासिक उटणे तुम्ही देखील तयार करु शकता.
यासाठी लागणारे साहित्य
गव्हला कचरा
चंदन पावडर
आंबेहळद
दारू हळद
साधी हळद
नागरमोथा
मुलतानी माती
गुलाबपावडर
वाळा पावडर.
(वरील सर्व साहित्य तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होते.)
कृती
सर्वप्रथम एका बाऊल मध्ये तिन्ही प्रकारची हळद प्रत्येकी एक चमचा घ्या. यांनतर यामध्ये गव्हला कचरा, चंदन पावडर, नागरमोथा, मुलतानी माती, गुलाबपावडर,आणि वाळा पावडर एकत्र करा. तुम्हाला उटणे किती सुगंधी हवे आहे, त्यानुसार चंदन पावडर आणि गुलाब पावडर त्यामध्ये मिसळा.घरच्या घरी तयार केलेलं हे उटणे भेसळमुक्त असेल आणि यामुळे त्वचेला कोणतीही हानी होणार नाही.अभ्यंगस्नान करताना हे उटणे दुधात,पाण्यात किंवा गुलाब जलामध्ये भिजवून घ्यावे. फकत दिवाळीतच नाही तर अंघोळीसाठी कायमस्वरूपी जर या उटण्याचा वापर केला तर तुमची त्वचा मुलायम,तेजस्वी राहू शकते.
Previous Articleकरवाढ हा संपूर्ण पालिका मंडळाचा निर्णय : नगराध्यक्ष रितेश नाईक
Next Article गोवा मद्यार्क विक्रेता संघटनेची मुख्यमंत्र्यांना भेट









