ईदच्या निमित्ताने अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. त्यातील शीरखुरम्याशिवाय ईद होऊच शकत नाही.पण शेवई खीर आणि शीर खुरमा जरी पाहायला सारखे असतील तरी चवीमध्ये बराच फरक आहे . तुम्हालाही या ईदला शीर खुरमा घरच्या घरी बनवायचा असेल, आजची रेसिपी नक्की फॉलो करा.
साहित्य
दूध दीड लिटर
केशर कड्या 10-12
बेदाणे – 10-12
काजू 5-6
बदाम 5-6
काजू 10-12
बदाम 10-12
पिस्ता -20-25
खारीक 4-5
तूप 4 छोटे चमचे
शेवई 100 ते 150 ग्राम
साखर 1 कप
वेलची पूड 1 tsp
कृती
सर्वप्रथम,एका मोठ्या पातेल्यात 1 चमचा तूप गरम करून त्यात बदाम, काजू, पिस्ता, बेदाणे आणि खजूर मंद आचेवर भाजून घ्या आणि बाजूला ठेवा..आता एक पातेलं घ्या, त्यात शेवया भाजून घ्या. मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यत शेवया भाजून घ्या आता एका मोठ्या भांड्यात दूध घाला आणि उकळू द्या. .आता केशर घाला आणि दूध जळू नये म्हणून अधूनमधून ढवळत राहायानंतर साखर घालून नीट ढवळून घ्या. आणि त्यामध्ये भाजलेल्या शेवया घाला आणि नीट ढवळून घ्या. दूध थोडे घट्ट होईपर्यंत मंद आचेवर उकळवा..शेवया नीट शिजल्यावर त्यात वेलची पूड टाका.आता त्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स घालून चांगले मिसळा.तयार झालेला स्वादिष्ट शीर-खुरमा तुम्ही फ्रीजमध्ये थंड केल्यावर किंवा गरमा गरम देखील सर्व्ह करु शकता.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









