जर तुम्हालाही संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी गरमा गरम आणि चटपटीत खायचं असेल तर तुम्ही हा टेस्टी मूग डाळ समोसा ट्राय करु शकता. या समोशाची ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया टेस्टी आणि हेल्दी मूग डाळ समोसा कसा बनवायचा.
साहित्य
२ कप मैदा
१ चमचा मीठ
२ चमचे तेल
पाणी
सारणासाठी साहित्य
३ वाट्या धुतलेली मूग डाळ (३-४ तास पाण्यात भिजवून ठेवा)
३ चमचे गरम मसाला
३ चमचे लाल तिखट
२ चमचे बडीशेप पावडर
२ चमचे धने पावडर
१ १/२ चमचा आमचूर पावडर
२ चमचे तेल
१ चमचा जिरे
चिमूटभर हिंग
चवीनुसार मीठ
कृती
सर्वप्रथम मूग डाळ समोसाचे सारण बनवण्यासाठी प्रथम मूग डाळ बारीक वाटून घ्या. आता एका पॅननध्ये २ चमचे तेल गरम करा आणि त्यात जिरे आणि हिंग घाला. तडतडायला लागल्यावर त्यात डाळ घाला आणि बाकीचे साहित्य घाला. हे मिश्रण मंद आचेवर भाजून घ्या. पूर्ण शिजल्यावर ते तव्याला चिकटणार नाही. मिश्रण गॅसवरून काढा आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
आता एका परातीमध्ये मैदा मीठ आणि तेल घालून पाण्याच्या मदतीने मळून घ्या. आता ते पीठ १५ मिनिटे बाजूला ठेवा. आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून गोलाकार लाटून अर्धे कापून घ्या. आता एक तुकडा घ्या आणि त्याच्या काठावर थोडेसे पाणी लावा आणि त्याचा शंकूच्या आकार करा. वरचा भाग चांगला दाबा आणि फिलिंग भरल्यानंतर बंद करा. समोसे तळण्यापूर्वी तेल पूर्णपणे गरम असावे. समोसे तेलात टाकल्यानंतर आच मंद करा आणि सोनेरी होईपर्यंत तळा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









