Mango Icecream:आंबा खाण्यासाठी अनेकजण उन्हाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात.आंबा आला की त्यापासून बरेच पदार्थ बनवले जातात. आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडणारं मँगो आईस्क्रीम घरच्या घरी कसं बनवायचं ते जाणून घेऊयात. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही नो कुकिंग इंस्टंट मँगो आईस्क्रीम बनवू शकता.
साहित्य
१ आंबा
साखर
२ चमचे मिल्क पावडर
अर्धा ग्लास दुध
४ चमचे दुधाची साय
कंडेन्स मिल्क
व्हॅनिला इसेंस
कृती
सर्वप्रथम आंब्याचे साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्या. त्यात चार चमचे दुधाची साय, दोन चमचे मिल्क पावडर, अर्धा ग्लास दुध आणि चवीनुसार साखर टाकून ते सर्व नीट मिक्स करून घ्या.यामध्ये तुम्ही साखरच्या ऐवजी कंडेन्स मिल्क सुद्धा टाकू शकता. हे सर्व नीट मिक्स करून घ्या. आता हे आईस्क्रीम सेटिंग मोल्डमध्ये टाका. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यात वरून आंब्याचे तुकडे सुद्धा टाकू शकता. यामुळे ते आणखी टेस्टी लागेल.शेवटी व्हॅनिला इसेंस टाकून हे फ्रीजमध्ये ठेवून द्या. तुम्ही हे ५ ते ६ तास किंवा रात्रभर ठेवू शकता. आईस्क्रीम सेट झाल्यानंतर थंड थंड सर्व्ह करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









