brinjal rice: घरी पाहुणे आल्यावर किंवा कोणत्याही कार्यक्रमात,सणसमारंभात मसाले भात हा ठरलेला मेनू असतो. त्याचबरोबर जिरा राईस, पुलाव, बिर्याणी असे भाताचे वेगवेगळे प्रकार केले जातात.आज आपण अशाच प्रकारचा चविष्ट वांगी भात कसा बनवायचा हे जाणून घेणार आहोत.
साहित्य:
दीड वाटी कोणताही वासाचा तांदूळ
वांगी २ ते ३ मध्यम आकाराची फोडी करून
दोन लवंगा,
१ चमचा जिरे ,
१ चमचा धने,
३ चमचे सुक्या खोबऱ्याचा किस,
१ चक्रीफुल
१ चमचा लाल तिखट
चिंच गूळ पातळ कोळ- पाव वाटी
गरम पाणी -४ वाट्या
१ चमचा तूप
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता, 2 हिरवी वेलची, दालचिनीचे 2 तुकडे.
कृती :
प्रथम तांदूळ धुवून घ्या, पूर्ण पाणी निथळून घ्या. यानंतर दोन लवंगा, १ चमचा जिरे, १ चमचा धने, ३ चमचे सुक्या खोबऱ्याचा किस, १ चक्रीफुल हे सर्व मंद आचेवर भाजून ह्याचा बारीक कोरडा मसाला करावा. कुकरमध्ये एक चमचा तूप आणि ३ चमचे तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता, 2 हिरवी वेलची, दालचिनीचे 2 तुकडे भाजून घ्यावेत. यानंतर तयार केलेला कोरडा मसाला, लाल तिखट घाला आणि त्यात वांग्याच्या फोडी घाला. थोडे परतून घ्या आणि त्यात चिंचेचा कोळ घाला. आता त्यात तांदूळ घाला आणि मीठ घाला. आणि त्यामध्ये गरम पाणी ओता. गरम पाण्यामुळे लगेच उकळी येईल, उकळी आली की कुकरचे झाकण लावा . ३ शिट्ट्या काढा, वांगी भात तयार.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









