उन्हाळ्याची चाहूल लागताच आंबे खाण्याचे वेध लागतात. मग आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जे पदार्थ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच आवडतात. मात्र आम्रखंड हे शक्यतो विकतच आणले जाते. पण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने देखील आम्रखंड बनवता येतो. आज आपण आम्रखंड घरी कसं करावं हे पाहणार आहोत.
साहित्य
घरातच बनवलेला किंवा विकत आणलेला चक्का,
पिठी साखर,
आंब्याचा पल्प,
इलायची
काजू आणि बदाम
कृती
चक्का घरी बनवण्यासाठी पाणी न घातलेल्या दुधापासून बनवलेले घट्ट दही एका सुती पातळ कापडात बांधून घ्यावे.
३-४ तासांसाठी त्याच्यावर एखादी वजनदार वस्तू ठेवून द्यावी. आपल्याला छान असा घट्ट मऊ चक्का मिळतो.
घरी चक्का बनवण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे दुकानातून फक्त चक्का विकत आणून देखील मस्त आम्रखंड बनवू शकतो.
यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये चक्का, बारीक केलेली साखर/ पिठीसाखर घालून फेटून घ्यावे.
चक्का आणि साखर एकजीव होईपर्यंत चांगले फेटून घ्यावे.
आंब्याचा गर काढून तो एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यावा.
थोडा पेस्ट सारखा झालेला आंब्याचा गर चक्का आणि साखरेच्या मिश्रणात घालावा. सर्व अगदी एकत्र चांगले फेटून घ्यावे. हे आपले आम्रखंड तयार आहे.
यामध्ये आता केशराचे दूध, इलायचीची बारीक केलेली पावडर, जायफळ पावडर आदी घटक आवड आणि उपलब्धते प्रमाणे घालून नीट मिसळून घ्यावे.
सजावटीसाठी वरून बारीक तुकडे करून काजू-बदाम टाकावेत.
खाण्याआधी हे तयार आम्रखंड साधारण 2 तास तरी फ्रिजमध्ये थंड होऊ द्यावे. त्यामुळे याला थोडा घट्टपणा येतो.
अशाप्रकारे हे घरगुती चवीचे आणि झटपट होणाऱ्या आम्रखंड आपण घरच्या घरीच बनवू शकतो.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









