दिवसाचा पहिला आहार म्हणजे सकाळचा नाश्ता.सकाळचा पौष्टिक नाश्ता हा आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतो. आज आपण अशाच एका पौष्टिक नाश्त्याची रेसिपी जाणून घेणार आहोत.ज्वारीच्या पिठापासून खमंग आणि पटकन होणारे वडे कसे बनवायचे हे आज जाणून घेऊयात.
साहित्य
ज्वारीचे पीठ 1 कप
बारीक रवा 1/4 कप
बेसन 2 चमचे
ओवा 1/2 चमचा
धने जिरे पूड 1 चमचा
हिरवी मिरची 3-4
आलं 1/2 इंच
लसूण पाकळ्या 8-10
कोथिंबीर
हिंग
तेल 1 चमचा
तिखट 1 चमचा
हळद 1/2 चमचा
तीळ 1 चमचा
मीठ
कृती
सर्वप्रथम एक कप ज्वारीचं पीठ घ्या.त्यामध्ये पाव कप बारीक रवा,२ चमचे बेसन, अर्धा चमचा ओवा,१ चमचा धने जिरे पूड,चवीनुसार मीठ,एक चमचा तीळ,चिमूटभर हिंग, हे सर्व जिन्नस घालावेत.आणि सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यावं.यांनतर पिठामध्ये १ चमचा लाल तिखट घालावे.आले,लसूण आणि मिरची मिक्सरला बारीक करून पिठामध्ये घालावी.नंतर त्यामध्ये १ चमचा तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.यांनतर पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यावं. पीठ हे थोडं घट्ट मळावे. यांनतर एका प्लास्टिक पिशवी वर पिठाचा गोळा करून तो गोल थापून घ्यावा आणि मध्ये एक छिद्र पाडावं. असे सर्व वडे करून घ्यावेत आणि मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत. खमंग आणि खुसखुशीत ज्वारीचे वडे दह्यासोबत सर्व्ह करा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









