संध्याकाळच्या चहाबरोबरच घरातील सगळेच काही चटपटीत खाण्याची मागणी करतात.पण संध्याकाळच्या नाश्ता हेल्दी असण्यासोबतच ते चटपटीत आणि टेस्टीही असावे.तुम्हाला काहीतरी क्रिस्पी आणि चविष्ट खायचे असेल तर तुम्ही काही मिनिटांत क्रिस्पी कॉर्न तयार करू शकता. हे क्रिस्पी कॉर्न जे बनवायला सोपे आणि झटपट बनतात. चला तर मग जाणून घेऊया क्रिस्पी कॉर्नची सोपी रेसिपी.
साहित्य
२ कप उकडलेले कॉर्न
३ चमचे कॉर्न स्टार्च
३ चमचे तांदळाचे पीठ
१ कांदा बारीक चिरलेला
कोथिंबीर बारीक चिरलेली
१ चमचा काळी मिरी पावडर
अर्धा चमचा लाल तिखट
अर्धा चमचा भाजलेले जीरं
अर्धा चमचा चाट मसाला
तळण्यासाठी तेल
मीठ चवीनुसार
कृती
प्रथम कॉर्न पाण्यात उकळवा. पाणी काढून टाका. आता हे कॉर्न एका बाऊलमध्ये ठेवा. त्यात कॉर्न फ्लोअर आणि तांदळाचे पीठ मिक्स करून चमच्याने हलवा. आता त्यात मीठ, काळी मिरी पावडर घालून मिक्स करून दहा मिनिटे राहू द्या. कढईत तेल गरम करून हे कोट केलेले कॉर्न तळून घ्या. तळल्यानंतर हे सर्व कॉर्न टॉवेल किंवा टिश्यू पेपरवर काढा. जेणेकरून ते सर्व अतिरिक्त तेल शोषून घेईल.आता फक्त हे क्रिस्पी कॉर्न बाऊलमध्ये घ्या. त्यावर लिंबाचा रस घाला. सोबत कांदा, बारीक कोथिंबीर घाला. तसेच तुम्ही तुमच्या आवडीच्या काही भाज्या टाकू शकता. भाजलेले जिरे, चाट मसाला घालून मिक्स करून चहासोबत सर्व्ह करा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









