उन्हाळा सुरु झाला कि उष्णतेमुळे थंडगार कोल्ड्रिंक पिण्याची सतत इच्छा होते. पण कोल्ड्रिंकपेक्षा लस्सी, ताक, पन्हं, कोकम सरबत अशी नैसर्गिक पेय पिण्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. आणि जर तुम्हाला थंडगार लस्सी पिण्याची इच्छा झाली असेल तर त्यासाठी लस्सीवाला अथवा हॉटेलमध्ये जाण्याची मुळीच गरज नाही. अगदी घरच्या घरी तुम्ही हॉटेलसारखी घट्ट आणि थंडगार लस्सी बनवू शकता.आज आपण घरच्या घरी ही लस्सी कशी बनवायची ते जाणून घेऊयात.
साहित्य
दही – १/२ किलो
दूध – १ कप
काजू – ५
बदाम – ५
मलई – २ टीस्पून
साखर – १/२ कप
बर्फाचे तुकडे
कृती
लस्सी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक मोठे भांडे घ्या आणि त्यात दही घाला. यानंतर रवीच्या साहाय्याने 30-40 सेकंद दही घुसळा. यानंतर, भांड्यात साखर घाला आणि दह्याबरोबर साखर एकसंध होईपर्यंत पुन्हा रवीने मिसळा. आता दह्यामध्ये थंड दूध घालून परत एकदा 2-3 मिनिटे चांगले घुसळून घ्या. आता त्यामध्ये काजू आणि बदामाचे बारीक तुकडे करा आणि एका भांड्यात फ्रेश क्रीम काढा. जर तुम्हाला थंड लस्सी प्यायची असेल तर तयार केलेली लस्सी काही वेळ फ्रिजमध्ये भांड्यात थंड होण्यासाठी ठेवा. लस्सी थंड झाल्यावर भांडे बाहेर काढा आणि लस्सी एका ग्लासमध्ये घाला. त्यावर फ्रेश क्रीम आणि चिरलेला ड्राय फ्रूट्स टाका. आवडत असल्यास तुम्ही यामध्ये टूटीफ्रूटी देखील घालू शकता.थंडगार आणि स्वादिष्ट लस्सी या उन्हाळ्यात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









