उन्हाळ्यात आईस्क्रीम, कुल्फी खायला कोणाला आवडत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच थंडगार कुल्फी आवडते. पण ही घरी बनवणे महिलांना त्रासदायक वाटते. आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कुल्फी कशी बनवायची हे जाणून घेऊयात.
साहित्य
दूध
क्रीम
मिल्क पावडर काजू
पिस्ता
बदाम
वेलची
साखर
केसर
कृती
सर्वप्रथम दूधात क्रीम आणि मिल्क पावडर मिक्स करून मंद आचेवर ठेवा.आता यात काजू, पिस्ता, बदाम टाकून मिक्स करा. दूध चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवा. यानंतर ते गॅसवरून खाली उतरवून थोडे थंड होण्यासाठी ठेवा. दूध थंड झाल्यावर कुल्फीच्या साच्यात भरून साधारण ४ ते ५ तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. तुमची टेस्टी कुल्फी तयार आहे.
Previous Articleआरटीओ कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन
Next Article मराठा आरक्षणासाठी लवकरच आयोगाचे गठण









