आर. के. पाटील यांचे प्रतिपादन : वाघवडे येथे आर. एम. चौगुले यांची प्रचारसभा : महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वार्ताहर /किणये
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी रिंगरोडसाठी हिसकावून घेण्याचा घाट सरकारने घातला आहे. या रिंगरोडच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर चाबुक मोर्चा काढण्यात आला. तसेच झाडशहापूर, बेळगुंदी येथे आंदोलने झाली. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी वाचविण्यासाठी राष्ट्रीय पक्षांकडून कोणीही आवाज उठवित नाहीत. मात्र महाराष्ट्र एकीकरण समिती नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी असते. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांच्या हितासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना निवडून आणा, असे आवाहन एपीएमसी माजी सदस्य आर. के. पाटील यांनी वाघवडे येथे केले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची रविवारी सायंकाळी वाघवडे गावात प्रचारसभा झाली. यावेळी आर. के. पाटील यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करून समितीच्या उमेदवाराला निवडून आणा, असे सांगितले. य् ाा सभेवेळी व्यासपीठावर आर. आय. पाटील, सरस्वती पाटील, दिनेश ओऊळकर, प्रकाश मरगाळे, सचिन गोरले, पिराजी शिंदे, मधुरा गुरव, प्रेमा मोरे, मोनाप्पा पाटील, कलाप्पा गुरव, नाग्रेंद्र पाटील, मल्लाप्पा पाटील आदी उपस्थित
होते. य् ाावेळी वाघवडे गावच्यावतीने पूर्णपणे आर. एम. चौगुले यांना पाठिंबा दर्शविण्यात आला. तसेच गावातून जास्तीजास्त मतदान चौगुले यांना करण्याचे आश्वासन यावेळी कार्यकर्त्यांनी दिले. याप्रसंगी समितीच्या नेतेमंडळींची भाषणे झाली. त्यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी, महाराष्ट्र एकीकरण समितीला बळकटी मिळण्यासाठी समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना विजयी करा, असे सांगितले. यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. लक्ष्मण गुरव, दुर्गाप्पा कांबळे, विष्णू पाटील, दयानंद देसाई, चांगाप्पा अंबोळकर, महादेव अंबोळकर, शिवाजी अंबोळकर, बसवंत कदम, महादेव शिंदे, दीपक सुतार, तुकाराम मुसळे, गावडू पाटील, बाळू पाटील, विष्णू चापगावकर, कल्लाप्पा पाटील, परशराम वाणी, कृष्णा कुंडेकर, गंगाराम केन्नूरकर, चांगाप्पा काकतकर, नारायण केन्नूरकर, मारुती बेळगुंदकर, मधु कुंडेकर, कृष्णा अंबोळकर, के. के. पाटील आदींसह गावातील कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









