Chhatrapati Sambhajiraje : खऱ्या अर्थाने बळीराजा अडचणीत आहे. शेतकऱ्यांना मदत करा अशी विनंती आज छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला केली. आज गुढीपाढव्या निमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांला मदत मिळावी अशी शासनाला विनंती केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात जास्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. सुपीक महाराष्ट्र असताना अशी का परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार केला पाहिजे. यासाठी दूरगामी नियोजन शासनाने करावे.असा जर प्लॅन तयार झाला तर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर शेतकरी चिंतेत राहणार नाही असेही ते म्हणाले.
‘स्वराज्य’ या संघटनेविषयी बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य का निर्माण केले याची माहिती सर्वसामान्यपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकसभा-विधानसभेत किती जागा लढवणार असल्य़ाचे विचारल्यावर संभाजीराजे म्हणाले की, स्वराज्याची निश्चित राजकारणाची भुमिका ठरली नाही मात्र जागा लढवणार हे निश्चित केले आहे.
Previous Articleमहाडीबीटीमार्फत प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन मिळणार
Next Article गडकरी धमकी प्रकरणातील तरुणी पोलिसांच्या ताब्यात








