वातावरणात बदल झाला कि लगेच सर्दी-खोकलाचा त्रास जाणवू लागतो. शिवाय खोकला बरेच दिवस राहतो. यावर औषधही काम करत नाही.पण गवतीचहा,अडुळसा,आले यांसारखे आजीच्या बटव्यातील काही घरगुती उपाय यावर नक्कीच परिणामकारक ठरू शकतात.पण लहान मुले आले खाण्यास टाळाटाळ करतात. अशावेळी जर त्यांना आल्याची कँडी बनवून दिली तर त्यांना ते नक्कीच आवडेल.याशिवाय त्यांची प्रतिकारशक्तीही वाढेल.आज आपण ही कँडी कशी बनवली जाते ते जाणून घेऊयात.
साहित्य
आले ४ ते ५
तूप १ ते २ चमचे
काळे मीठ १ टीस्पून
हळद १ टीस्पून
काळी मिरी १ टीस्पून
बटर पेपर २ ते ३
कृती
सर्वप्रथम आले चांगले धुवून वाळवा.
आता ते थेट गॅसच्या आचेवर ठेवा आणि ते नीट भाजून घ्या.
नीट भाजल्यावर त्याचा वरचा पृष्ठभाग काळा पडल्यावर ताटात ठेवा.
त्यांना एका प्लेटमध्ये ठेवून थंड करा आणि नंतर चमच्याने किंवा चाकूच्या मदतीने सोलून घ्या.
आता चाकूने त्यांचे छोटे तुकडे करा आणि मिक्सरच्या ब्लेंडरमध्ये ठेवून बारीक करा.
आता गॅसवर तवा ठेवा आणि त्यात एक चमचा तूप टाका. आता ही आले पेस्ट पॅनमध्ये चांगली तळून घ्या.
चांगले भाजून झाल्यावर त्यात ३०० ग्रॅम गूळ टाका.
सर्व गूळ मेल्ट होईपर्यंत चमच्याने ढवळत राहा.
गूळ पूर्णपणे मेल्ट झाल्यावर त्यात काळे मीठ, हळद आणि काळी मिरी घालून शिजवा.
आता चमच्याच्या मदतीने हे द्रावण बटर पेपरवर १ इंच बाजूने ओतून सेट होऊ द्या.
तयार झालेली कॅण्डी तुम्ही मुलांना चॉकोलेट म्हणून ही देऊ शकता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









