दिवाळीच्या चिवड्याची चव आणखी वाढवणारा पदार्थ म्हणजे शेव. नुसती शेव जरी कमी खाल्ली जात असली तरी पोहे, उपमा, भेळ, चिवडा ह्या पदार्थांची शेव लज्जत वाढवते.शेवचे अनेक प्रकार देखील आहेत. आज आपण कुरकुरीत खमंग शेव घरच्या घरी कशी बनवायची हे जाणून घेणार आहोत. यासाठी लागणारे साहित्यदेखील कमी आहे शिवाय शेव होते ही झटपट.
साहित्य
४ वाट्या बेसन
अर्धी वाटी,तांदळाचे पीठ
२ चमचे ओवा वाटून
पाणी
अर्धा चमचा हिंग
मीठ
पाव चमचा हळद
तेल.
कृती
सर्वप्रथम परातीत बेसन आणि तांदळाचे पीठ चाळणीने चालून घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ, हिंग, हळद घालून सगळं एकत्र करून घ्यावे. त्यात चार चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. ते मोहन सगळ्या पीठाला चांगले चोळून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये ओवा घालावा. नंतर गरजे प्रमाणे पाणी घालून पीठ भिजवावे. पीठ थोडं सैलसरच असावे . हे पीठ दहा मिनिटं बाजूला ठेवून द्यावे. यांनतर चकलीच्या साच्यात शेवेची बारीक जाळी घालून पीठ त्यात भरावे आणि गरम तेलात शेव पाडून शेव तळून घ्यावी.
टिप्स
शेव पाडण्यासाठी बारीक जाळी वापरावी.
तेल फार गरम नको मध्यम गरम असावे .शेव घालताना गॅस मोठा व घालून झाली की गॅस मध्यम करावा.
शेवेसाठी लागणारं पीठ घट्ट असू नये.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









