बागायती आणि शेतीचे नुकसान मोठे नुकसान
वेंगुर्ले (वार्ताहर)-
पाल गावात गवारेड्यांच्या कळपाचा हैदोस आंबा ,काजू, नारळ ,सुपारी ,यासह भात शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. या गवा रेड्यांच्या कळपाच्या वावरामुळे पाल गावातील शेतकरी व नागरिक भयभीत झालेले आहेत. शनिवारी पाल गावात गवारेड्याच्या कळपाने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हानी केली यात प्रामुख्याने गणपत आमडोसकर, अनंत मांजरेकर, गोपाळ गावडे, राजाराम गावडे, तुकाराम गावडे, अर्जुन गावडे, पंकज गावडे श्री गुंडू गावडे, कमलाकर गावडे, लवू गावडे, मनोहर गावडे, विलास गावडे, नाना गावडे, एकनाथ परब, गजानन परब, बाळा परब, काशिनाथ आमडोस्कर, योगेश कोळसुलकर, बाबल आमडोस्कर, श्रीकांत मेस्त्री, सोनू मेस्त्री, दीपक गावडे आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काजू, आंबे, नारळ, सुपारीचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले. तसेच गवारेड्यांच्या मुक्त वावरामुळे भीतीचे वातावरण पाल गावात निर्माण झाले असून सर्व शेतकरी भयभीत झाले आहेत. वनविभागाने या गव्यांचा त्वरित बंदोबस्त करावा व पाल गावातील शेतकरी व नागरिक यांना भयमुक्त करावे. तसेच ज्या शेतकऱ्यांची नुकसानी झालेली आहे त्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पाल गावातील शेतकऱ्यातून होत आहे.









