ब्रिगेडियरसह अनेक अधिकाऱ्यांना एकसारखाच गणवेश
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय सैन्यात सध्या अनेक बदल होताना दिसून येत आहेत. स्त्राr-पुरुष समानतेसोबत भारतीय सैन्याला मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. आता भारतीय सैन्यातील ब्रिगेडियर तसेच या स्तरावरील अधिकाऱ्यांना एकसारखे गणवेश निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलिकडेच पार पडलेल्या सैन्य कमांडर्सच्या परिषदेदरम्यान विस्तृत विचारविनिमयानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या नव्या निर्णयानुसार सैन्यातील कर्नल आणि त्याखालच्या पदावरील अधिकाऱ्यांच्या गणवेशामध्ये कुठलाच बदल होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिगेडियर आणि त्यावरील अधिकाऱ्यांचे हेडगियर, शोल्डर रँक बॅज, गॉर्गेट पॅच, बेल्ट आणि शूज आता सारखेच असतील. हा बदल एक ऑगस्टपासून लागू होणार असल्याचे समजते.









