आचारसंहितेत सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
सोलापूर : निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कुर्जुवाही पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू, इनोव्हा कार आणि मोबाईल असा २ लाख ५५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चार नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता कुर्जुवाडी-माढा रोडवरील मोसरे गावाच्या हद्दीत कार (एमएच १२ एफ. झेड. ०९४२) तपासली असता कारमध्ये अमोल वत्तात्रय शिंदे (वय २९. रा. तांबोटी, ता. मोहोळ) हा बेकायदेशीररित्या गोवा राज्यापुरती मर्यादित एक लाख ५ हजार रुपयांची व्हिस्की (एकूण ७०
बॉक्स) वाहतूक करताना आढळला.
याशिवाय २ लाख ५० हजार रुपयांची इनोव्हा कार आणि ५ हजार रुपयांचा मोबाईल जप्त आला आहे. करण्यात या प्रकरणी पो. ना. विजय घोगरे यांच्या फिर्यादीवरुन दत्तात्रय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सपोनि मुल्ला तपास करत आहेत.








