वार्ताहर /मजगाव
शुक्रवारी सायंकाळी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अनेक झाडांची पडझड तर अनेकांच्या घरगुती साहित्याचे नुकसान झाले तर मजगावातील तानाजी गल्लीतील दोन वीजखांब पडले आहे. सदर वळीव पाऊस हा मजगाव परिसराला पहिलाच दमदार पडल्याने शेतकरी वर्गात आनंदी वातावरण पसरले आहे. अनेक दिवसांपासून उष्म्यात वाढ झाली होती. त्यामुळे नागरिक हैराण झाले होते. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला आहे.









