प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव हा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधील सर्वांत मोठा आणि सर्वाधिक साजरा केला जाणारा उत्सव आहे. जवळपास प्रत्येक घरात गणपतीच्या मूर्तीची पूजा केली जाते. लोकमान्य सोसायटीच्यावतीने “माझा गणराया’’ या नावाने घरगुती गणेशमूर्ती सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे. लोकमान्य सोसायटीच्या शाखांद्वारे गणेशोत्सवादरम्यान 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2022 या कालावधीत 10 दिवस स्पर्धा आयोजित केली जाईल. लोकमान्य सोसायटीच्या सर्व शाखांमधून प्रवेशिका उपलब्ध असतील. गणेशोत्सवाच्या 2 सप्टेंबर 2022 ला नोंदणी बंद होईल. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत जास्तीतजास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.









