शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई देताना योग्य ती दखल घेऊन भरपाई द्यावी. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देताना कोणताच भेदभाव करण्यात येवू नये. पात्रता धारक शेतकऱ्यांना भरपाई देऊन पारदर्शकता राखण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन नेगिलयोगी रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. राज्यात 2019 ते 2022 पर्यंत अतिवृष्टी होवून शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. जीवितहानीसह वित्त हानीही झाली होती. 90 टक्के पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते. यावेळी सरकारकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली होती. दरम्यान भरपाई देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून पात्रताधारक शेतकऱ्यांना भरपाई न देता भेदभाव केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. हे टाळण्यासाठी यंदा पावसाअभावी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून भरपाई देताना पारदर्शकता ठेवण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे केली आहे. पावसाअभावी यंदा अत्यंत खडतर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई देताना कोणताच भेदभाव करण्यात येवू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्यावी. शेतकऱ्यांवर अन्याय होवू नये, याची दखल घ्यावी, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.









