पाचगाव वार्ताहर
मोरेवाडी तालुका करवीर येथील मुख्य चौकातील हायमास्ट लाईट बंद अवस्थेत असल्यामुळे मोरेवाडी परिसरातील मुख्य चौक अंधारात आहे. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना अंधारातून चाचपडत प्रवास करावा लागत आहे. माजी आमदार अमल महाडिक यांच्या निधीमधून मोरेवाडी परिसरात लाखो रुपये खर्च करून हायमास्ट लाईट पोल उभे करण्यात आले. हायमास्ट लाईट मुळे मोरेवाडी परिसरातील सर्व चौक प्रकाशित झाले होते.मात्र सध्या या हायमास्ट दिव्यांची देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे सर्व चौकातील हायमास्ट लाईट बंद अवस्थेत आहेत. यामुळे या हायमास्ट लाईटवर लाखो रुपये खर्च करूनही मोरेवाडीतील मुख्य चौक अंधारातच आहेत.
मुख्य चौकात अंधारामुळे अनेक वेळा अपघात झाले आहेत. आर. के .नगर मुख्य चौकातही पोल उभा केला आहे. मात्र येथील हायमास्ट लाईट सुरू नसल्यामुळे हा चौक नेहमी अंधारातच असतो. अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी या चौकात धाडसी चोरी देखील केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार मोरेवाडी परिसरातील आठ मुख्य चौकांमध्ये हे हाय मास्ट लाईट पोल उभे केले आहेत. याचे लाईट बिल सुमारे चार लाख रुपये थकीत आहे. हे लाईट बिल मोरेवाडी ग्रामपंचायतने न भरल्यामुळे ही लाईट बंद अवस्थेत आहे. या एका पोलसाठी सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. मात्र हे हाय मास्ट लाईट पोल बंद अवस्थेत असल्यामुळे यासाठी खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. मोरेवाडी ग्रामपंचायतला गेल्या कित्येक महिन्यांपासून हायमास्टचे लाईट बिल न भरता आल्यामुळे ग्रामस्थांना मुख्य चौकातून अंधारातूनच प्रवास करावा लागत आहे. यामुळे मोरेवाडी ग्रामपंचायतच्या कारभाराबद्दल ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतची उदासीनता
मोरेवाडी परिसर प्रकाशित करण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी लाखो रुपये खर्च करून सर्व मुख्य चौक प्रकाशित केले होते. मात्र ग्रामपंचायतच्या उदासीनतेमुळे मोरेवाडीतील हायमास्ट लाईट बंद अवस्थेत आहे. यामुळे मुख्य चौक अंधारात आहेत. ग्रामपंचायतीने हायमास्ट लाईट तात्काळ सुरू करावेत
आशिष पाटील,ग्रामपंचायत सदस्य मोरेवाडी
लवकरच हाय मस्त लाईट सुरू करणार
हायमास्ट लाईटचे सुमारे चार लाख रुपये लाईट बिल थकीत आहे.हे लाईट बिल भरून लवकरच हायमास्ट लाईट सुरू करणार.
ए. व्ही. कांबळे
लोकनियुक्त सरपंच,मोरेवाडी
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









