भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पार्श्वभुमीवर 25 डिसेंबर रोजी अभिनेता पंकज त्रिपाठी याने मैं अटल हूं म्हणत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो अटल बिहारी वाजपेय़ी यांच्या गेटअप मध्ये दिसत असून तो माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेय़ी यांच्या बायोपीकमध्ये काम करत आहे.
बायोपिक ‘मैं अटल हूं’च्या निर्मात्यांनी माजी पंतप्रधान या शिर्षकाखाली पंकज त्रिपाठी यांचा फर्स्ट लुक जगासमोर आणला आहे. मैं अटल हूं हा चित्रपट बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेय़ी यांच्या राजकिय प्रवासाभोवती फिरतो. केवळ पंतप्रधानच नाही तर एक कवी, एक राजकारणी, एक नेता आणि एक मानवतावादी व्यक्तीमत्व म्हणून त्यांकडे पाहीले जात होते.
पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार आहे असे निर्मात्यांनी जाहीर केल्यापासून प्रेक्षक पंकज त्रिपाठी यांचे वाजपेयी याच्या लुकमध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते. पंकज त्रिपाठीच्या चाहत्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. मैं अटल हूंचे मोशन पोस्टर प्रसिध्द आले आहे असून पंकज त्रिपाठी हुबेहूब अटलबिहारी वाजपेयींसारखे दिसत आहे.
Previous Articleराजकीय उदासीनतेमुळे मराठीला अभिजात दर्जा मिळण्यास विलंब
Next Article विजय नाईक यांचे निधन









