कृषीसह सुमारे 1500 कोटींची गुंतवणूक : व्यवसाय विस्तारावर भर
वृत्तसंस्था/ मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी महिंद्रा ऍण्ड महिंद्रा येत्या काळामध्ये 15,300 कोटी रुपये गुंतवणार असल्याची माहिती आहे. 2022 ते 2024 या कालावधीत ऑटो क्षेत्रासह शेतीसंबंधीत उपकरणे आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या व्यवसाय विस्तारासाठी सदरची गुंतवणूक केली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
अशी होणार गुंतवणूक
आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीने आतापर्यंत 3200 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. उर्वरित 12,100 कोटी रुपये हे आर्थिक वर्ष 2023 व आर्थिक वर्ष 2024 मध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवले जाणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. वार्षिक तत्त्वावर 3000 ते 4000 कोटी रुपये व्यवसाय विस्तारासाठी गुंतविले जाणार आहेत. सुव्ह गटातील कार्स तसेच ट्रक्टर क्षेत्रावर भर देताना इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांचा व्यवसाय विस्तार करण्यासाठीही कंपनी आगामी काळात परिश्रम घेणार आहे.
एक्सयुव्ही 700 हे वाहन आगामी काळात इलेक्ट्रिकवर चालणारे सादर केले जाणार आहे. त्याकरिताही गुंतवणूक केली जाणार आहे. दर महिन्याला 9500 ग्राहकांनी सदरची गाडी बूक केली आहे. आतापर्यंत 78 हजारहून अधिक जणांनी गाडीसाठी नोंदणी केली आहे. सुव्ह गटातील भारतीय बाजारातील वाहनांचा वाटा हा 17 टक्के इतका आहे.









