नवी दिल्ली :
ऑटो क्षेत्रातील कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा यांनी चौथ्या तिमाहीत निकाल घोषीत केला असून कंपनीने सदरच्या अवधीत 2437 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. जानेवारी ते मार्चदरम्यानच्या कालावधीत नफ्यात 24 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. कंपनीची ऑटोसह फार्मा, सेवा व तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रात दमदार कामगिरी झाल्याने नफा चांगला दिसून आला आहे. कंपनीने निकालानंतर 25.30 रुपये प्रति समभाग लाभांशाची घोषणाही केली आहे. निकालानंतर कंपनीचा समभाग बाजारात दीड टक्कापेक्षा अधिक वाढलेला दिसला. कंपनीने मार्चच्या तिमाहीत 31,353 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.









