मुंबई
ऑटो क्षेत्रातील कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा यांनी आपल्या प्रकारातील विविध कार्सच्या किमती वाढवल्या आहेत. सदरच्या किमती 14 एप्रिलपासून वाढविण्यात आल्याची माहिती महिंद्राने दिली आहे. सुव्ह गटातील थार, स्कॉर्पिओ व एक्सयुव्ही-700 कार्स आता महाग झाल्या आहेत. 2.5 टक्के अर्थात 10 हजार ते 63 हजार रुपये इतक्मया किमती विविध कार्सच्या वाढल्या आहेत. स्टीलसह विविध धातूच्या वाढलेल्या किमतीने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. परिणामी कंपनीने हा भार ग्राहकांवर लादला आहे.









