मुंबई :
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा या कंपनीने आपल्या तिमाहीमधील नफा कमाईचे आकडे नुकतेच सादर केले आहेत. यामध्ये आर्थिक वर्ष 2023-24 च्या जुलै ते सप्टेंबर दरम्यानच्या कामगिरीचे आकडे सादर केले आहेत. कंपनीला निव्वळ नफा हा 3,451.8 कोटी रुपयावर राहिला असून हा वार्षिक आधारे पाहिल्यास जवळपास 66.9 टक्क्यांनी अधिक राहिल्याची नोंद केली आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्राने मागील वर्षी समान तिमाहीत 2,068 कोटी रुपयाचा नफा प्राप्त केल्याची माहिती आहे.
महसूलात 15.7 टक्क्यांनी मजबूत
कंपनीचा महसूल हा वार्षिक 15.7 टक्क्यांनी वाढून तो 24,310 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षात याच कालावधीत हा 21,010 कोटी रुपये झाला आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्राचा ऑपरेटिंग नफा हा सप्टेंबर तिमाहीत 20 टक्क्यांनी वाढून तो 2935 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे.









