मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कृषी व्यवसायासाठी केदार आपटे यांची प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे. श्रीयुत आपटे हे याआधी जीओबीपी कंपनीमध्ये मुख्य विपणन अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची महिंद्रा कंपनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कृषी विभागातील उपकरण क्षेत्र तसेच दुचाकी व्यवसायाकरीता निवड केली आहे.









