1 अब्ज डॉलर्सवर पोहचले बाजार भांडवल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिंद्रा समूहाची बांधकाम क्षेत्रात कार्यरत रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड यांनी 1 अब्ज डॉलर बाजारमूल्याचा महत्त्वाचा टप्पा ओलांडण्यात नुकतंच यश मिळवलं आहे.
बांधकाम क्षेत्रातील ही कंपनी प्रगतीपथावर कार्य करते आहे, असे महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले. कंपनीच्या यशामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात समूहाचा प्रवेश निश्चित आहे. आज महिंद्रा लाईफस्पेसचे बाजार भांडवल 1 अब्ज डॉलरचा टप्पा प्राप्त करुन ते आमच्या समूहातील पुढील ‘युनिकॉर्न’ बनले असल्याचे आनंद महिंद्रा यांनी स्पष्ट करत आगामी काळातही वाटचाल यशस्वीच राहील, असे ते म्हणाले.