मार्च तिमाहीअखेरची कामगिरी : महसुलातही झाली वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीने मागच्या आर्थिक वर्षाच्या तिमाहीपेक्षा या खेपेला 18 टक्के वाढीसह 2,637 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीची मसुलातही चांगली कामगिरी झालीय. कंपनीचा तिमाही व एकंदर वार्षिक अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. वाहन, कृषी उपकरण आणि सेवा क्षेत्रामध्ये कंपनीची कामगिरी कौतुकास्पद राहिली आहे.
मागच्या वर्षी समान तिमाहीमध्ये 2,237 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 अखेरच्या तिमाहित 32,366 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीमध्ये 25,934 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता.
आर्थिक वर्षातील कमाई
2022-23 या संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार करता कंपनीने 56 टक्के वाढीसह 10,282 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक लाभ असल्याचेही कंपनीकडून सांगितले जात आहे. कंपनीने याच आर्थिक वर्षांमध्ये 1,21,269 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. कंपनीसाठी आर्थिक वर्ष खूपच फलदायी ठरले असल्याचा दाखला या निकालावरुन स्पष्ट होतो.