अनुपम खेरसोबत झळकणार
अनुपम खेर सध्या स्वतःचा 525 वा चित्रपट ‘द सिग्नेचर’वर काम करत आहेत. अनुपम यांनी अलिकडेच या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहेत. या चित्रपटात महिमा चौधरी, रणवीर शौरी, नीना कुलकर्णी, मनोज जोशी आणि स्नेहा पॉल हे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले असून याचे निर्माते के.सी. बोकाडिया आहेत.

या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाल्याची माहिती अनुपम खेर यांनी दिली आहे. द सिग्नेचरसोबत महिमा चौधरी ही दीर्घकाळानंतर मोठय़ा पडद्यावर परतणार आहेत. महिमा अलिकडेच कॅन्सरवरील उपचार स्वतःवर करवून घेतले आहेत. महिमासाठी हा चित्रपट भावनिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर अनुपम खेर या चित्रपटाचे सह-निर्माते असल्याने त्यांच्यासाठीही हा चित्रपट महत्त्वपूर्ण आहे. गजेंद्र अहिरे यांचे दिग्दर्शन लाभल्याने या चित्रपटाचे सादरीकरण अन् पटकथा प्रभावी असणार आहे. तसेच अभिनयनिपुण कलाकार चित्रपटात असल्याने तो पाहण्याचा अनुभव अत्यंत वेगळा ठरू शकतो.









