खानापूर : चापगाव येथील श्री सत्यनारायण देवस्थानच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित खळ्dयाच्या कुस्ती मैदानात महेश तीर्थकुंडये हा विजेता ठरला. तर प्रथम क्रमांकाच्या मेंढ्याच्या कुस्तीत पंकज चापगाव विजयी झाला. प्रथम क्रमांकाची मेंढ्याची कुस्ती पंकज चापगाव विरुद्ध नारायण अलारवाड यांच्यात झाली. तर द्वितीय क्रमांकाची कुस्ती निरंजन यळूर विरुद्ध महेश तीर्थकुंडे यांच्यात झाली. दोन्ही मल्लांनी चटकदार कुस्तीला प्रारंभ केला. परंतु निरंजन यांच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याने त्याने कुस्ती खेळण्यास नकार दर्शवला. त्यामुळे महेश तीर्थकुंडे याला विजयी घोषित करण्यात आले.
तिर्थकुंडें आणि निरंजन यांची कुस्ती भाजप नेते सदानंद पाटील, राजू सिद्धांनी, किशोर हेब्बाळकर, सदानंद मासेकर, उदय भोसले, भाजपा सेक्रेटरी मल्लाप्पा मारीहाळ, डॉ. रोशन पाटील, अंधारे आदींच्या हस्ते लावण्यात आली. तर प्रथम क्रमांकाची मेंढ्याची कुस्ती श्री सत्यनारायण देवस्थान पंच कमिटीच्यावतीने लावण्यात आली. यामध्ये पंकज चापगाव विरुद्ध नारायण अलारवाड यांच्यात चटकदार कुस्ती झाली. तर तृतीय क्रमांकाची कुस्ती राजू गंदिगवाड विरुद्ध पैलवान पंकज चापगाव यांच्यात झाली. याही कुस्तीमध्ये पंकज चापगाव यांनी यश संपादन केले. ही कुस्ती माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्ती आखाड्यात लहान मोठ्या अशा जवळपास 50 हून अधिक कुस्त्या लावण्यात आल्या. दोन दिवस चाललेल्या या कुस्ती मैदानात अनेक लहान-मोठ्या चटकदार कुस्त्या झाल्या. अनेक देणगीदारांच्या सहकार्यातून कुस्त्यांसाठी प्रोत्साहन देण्यात आले.









