मॅटवरील कुस्ती स्पर्धेत गगन पुनजगौडा, प्रांजल बिर्जे यांना ‘बालकेसरी’
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगावच्यावतीने सालाबादप्रमाणे बेळगावमध्ये प्रथमच गुणावर आधारित मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात अंतिम सामन्यात महेश लंगोटीने कंग्राळीच्या पार्थ पाटीलचा पराभव करुन तर महिला गटात हल्याळच्या प्रिसीटा सिद्धीने बेळगावच्या स्वाती पाटीलचा पराभव करून केसरी वन किताबासह चांदीची गदा पटकाविली. बेळगाव तालुका मर्यादित मुलांच्या गटात अलारवाडच्या गगन पुनजगौडा, मुलींच्या गटात अनगोळच्या प्रांजल बिर्जे यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करुन बाल केसरी वन किताबाचे मानकरी ठरले. आनंदवाडी आखाडा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यातून जवळपास 700 हून अधिक कुस्तीपटूंनी भाग घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोनाली सरनोबत, स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी, परशूरामभाऊ नंदिहळ्ळी, मारूती घाडी, डॉ. गणपत पाटील, हिरालाल चव्हाण, वैभव खाडे, भूषण काकतकर, सुभद्रा सांबरेकर, मदनकुमार भैरपण्णावर, सुनिल देशपांडे, मल्लाप्पा सांबरेकर, वाय. पी. नाईक यांच्या उपस्थितीत फित कापून आखाड्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हनुमान व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कुस्ती स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध गटातील कुस्त्या लावण्यात आल्या.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
बेळगाव तालुका मर्यादित मुलांचा विभाग 20 किलो गट : वकुंद काकतकर (विजेता), हर्ष अंकलीकर, बेळगाव (उपविजेता), साई गावडे, बेळगावने तिसरा क्रमांक पटकाविला. 28 किलो गट : गगन पुनजगौडा, अलारवाड (विजेता), अनुज कडेमणी, बेळगाव (उपविजेता), स्वस्तीक मोरे, कावळेवाडीने तिसरा क्रमांक पटकाविला. 28 किलो मुलींचा गट : प्रांजल बिर्जे, अनगोळ (विजेती), प्रार्थना वकुंद, बेळगाव (उपविजेती), अनुष्का पाटील, बेळगावने तिसरा क्रमांक मिळविला. खुल्या गटात पुरुष विभागात 32 किलो : अब्दुल दो•मणी, धारवाड (विजेता), प्रदीप गोल्याळी, हण्णीकेरी (उपविजेता), आदी हल्याळ व लक्ष्मण सावंत, बेक्कीणकेरी यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.
36 किलो गटात : अभी कुरबर, धारवाड (विजेता), विलास, गोकाकफॉल्स (उपविजेता), नित्यानंद सिद्धी, हल्याळ व नरेंद्र दावडे, मागुर-बेळगाव यांनी तिसरा क्रमांक मिळविला. 44 किलो गटात : बजरंग दो•मणी, धारवाड (विजेता), निंगाप्पा दांडेकर, हल्याळ (उपविजेता), जीवन पवार, हल्याळ व प्रथमेश पावशे, कंग्राळी यांनी तिसरा क्रमांक मिळविला. 54 किलो गटात : चेतन तुकोजी, धारवाड (विजेता), ओमकार सौयदण्णावर, बेळगाव (उपविजेता), दादापीर सौयदण्णावर, धारवाड व ओमकार धारवाड यांनी तिसरा क्रमाक मिळविला. 63 किलो गटात : अजित चौगुले, बेळगावने (विजेता), दर्शन तलवार (उपविजेता), आदिनाथ कामकर, तिर्थकुंडे व सिद्धार्थ कामकर, तिर्थकुंडे यांनी तिसरा क्रमाक मिळविला.
74 ते 84 किलो गटात : महेश लंगोटी, बेळगाव (विजेता), पार्थ पाटील, कंग्राळी (उपविजेता), मल्लेश मेत्री, बेळगाव व सतिश गोकाक यांनी तिसरा क्रमाक मिळविला. महिला कुस्ती पटूंसाठी 32 किलो गटात : नव्या टी., हल्याळ (विजेती), मनस्वी जायाण्णाचे, मजगाव (उपविजेती), रेणुका सनदी, गोकाकफॉल्स व विद्या कोकितकर, हल्याळ यांनी तिसरा क्रमांक मिळविला. 36 किलो गटात : प्रभावती लंगोटी, धारवाड (विजेती), वाणी हल्याळ (उपविजेती), आदिती कोरे, बेळगाव व बी. के. चैतन्य, बेळगाव यांनी तिसरा क्रमाक मिळविला. 44 किलो गटात : पुष्पा नाईक, धारवाड (विजेती), जानवी किरण, धारवाड (उपविजेती), सौंदर्या वातीकर, हल्याळ व भक्ती गोडा, खानापूर यांनी तिसरा क्रमांक मिळविला. 52 किलो गटात : भक्ती पाटील, बेळगाव (विजेती), विद्याश्री गंनेण्णावर, हल्याळ (उपविजेती), सानिका पाटील, कडोली व अनुष्का जनगौडा, बेळगाव यांनी तिसरा क्रमांक मिळविला. 60 ते 70 किलो वजनी गट : प्रिसीटा सिद्धी, हल्याळ (विजेती), स्वाती पाटील, बेळगाव (उपविजेती), शालन सिद्धी, हल्याळ व प्रांजल तुळजाई, बेळगाव यांनी तिसरा क्रमाक मिळविला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बालकेसरी बेळगाव, महिला बेळगाव केसरी, बेळगाव केसरी यांना किताब, चांदीची गदा, प्रमाणपत्र, चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी उद्योगपती प्रसन्ना घोटगे, उद्योगपती मदनकुमार भैरपण्णावर, शंकरगौडा पाटील, डॉ. गणपत पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, नितीन जाधव, भूषण काकतकर, राजेंद्र कलघटगी, नागेश सातेरी, मोनाप्पा मोरे, सतिश पाटील, बाळाराम पाटील, अशोक हलगेकर, वसंत ताशिलदार, परशराम ताशिलदार, प्रफुल्ल सोमण्णाचे, प्रमोद पाटील, सुहास हुद्दार, विश्वास पवार, विलास घाडी, जवाहर देसाई आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी बेळगाव, हल्याळ, धारवाड, डीवायईएस संकुल, एनआयएस कुस्ती प्रशिक्षक तसेच बेळगाव मराठा लाईफ इनफंट्री आर्मी कुस्ती प्रशिक्षक यांनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी बेळगाव परिसरातील कुस्तीप्रेमी नागरीक, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









