उमरगा :
मराठवाड्यातील युवक काँग्रेसचा प्रमुख चेहऱ्यापैकी एक असलेले धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र महेश देशमुख यांचा ओडीसा राज्याचे युवक काँग्रेसच्या प्रभारी पदी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिंब यांनी जाहीर केली आहे.
यापूर्वीही लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय युवक काँग्रेस कडून तेलंगणा राज्य व बेंगलोर शहर राष्ट्रीय समन्वयक पदी महेश देशमुख यांची निवड करण्यात आली होती.यामध्ये तेलंगणा व कर्नाटका मागील लोकसभेच्या तुलनेत घवघवीत असे यश मिळवण्यात आले होते.
महेश देशमुख हे मुळचे उमरगा तालुक्यातील पेठसांगवी गावचे असुन ते काँग्रेस चे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत.त्यामुळे राष्ट्रीय युवक काँग्रेस कडून एक महत्वाची जवाबदारी देशमुख यांना देण्यात आली आहे. देशमुख नेहमी सामाजीक कामत आग्रेसर असतात त्यामुळे सर्वदुर ते परिचीत आहेत. काँग्रेसचे महेश देशमुख मराठवाड्यात सातत्याने पक्ष वाढीसाठी वरिष्ठाच्या संपर्कात राहून प्रयत्न करत असतात. प्रत्येक नैसर्गिक अडचणीत पुढाकार घेऊन मदतीचा हात देत असतात. यामध्ये करोना काळात उमरग्यातील कोविड सेंटर सह राज्यातील अनेक कोविड सेंटरना आर्थिक मदत करणे असो कि गावात तीव्र पाणीटंचाई असताना स्वतःच्या शेतातील विहिरीचे पाणी स्वखर्चाने गावात पुरवणे असो, असे विविध उपक्रम विवेकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवत असतात. नुकत्याच झालेल्या उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या विजयासाठी सभा घेणे प्रचारात सक्रिय राहून सर्वतोपरी विजयासाठी प्रयत्न करून विजय मिळवला. युवक काँग्रेसचे सभासद नोंदणी करण्यात मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात विविध भागात प्रयत्न केलेले आहेत. या निवडीचे मराठवाड्यात सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.








