राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवणार अशी धमकीची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केला असल्याची ही क्लिप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या क्लिपमध्ये जे संभाषण झाले त्यामध्ये ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तथा आव्हाड समर्थकांनी महापालिका मुख्यालयात गेटवर मारहाण केली होती. या प्रकरणी महेश आहेर यांनी पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यासह त्यांच्या सात कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार जणांना ताब्यात घेतले आहे. यावर आता अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महेश आहेर म्हणाले की, मी अनेकदा अनाधिकृत बांधकामं तोडली आहे. ही बांधकाम तोडू नये, यासाठी माझ्यावर मोठ्या प्रमाणात दबाव होता. माझ्या मतदारसंघात मला विचारल्या शिवाय कारवाई करू नये, असे मला आव्हाडांनी सांगितले होते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या मी येत्या काही दिवसांत पुढे आणणार आहे. तसेच मला आणि माझ्या कुटुंबियांना जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून धोका असल्याचेही आहेर यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आव्हाडांना जीवे मारण्याची जी क्लिप व्हायरल झाली आहे, ती क्लिप मी ऐकलेली नाही, त्यामुळे तो आवाज कोणाचा हे मी नक्की सांगू शकत नाही. पण ५ जानेवारी २०२३ रोजी मी एका व्यक्तीविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यावेळी पोलिसांकडे मी एक पेनड्राईव्ह सादर केला होता. ज्यामध्ये काही ऑडियो क्लिप होत्या. या ऑडिओ क्लिपमध्ये त्याने माझ्या हत्येची सुपारी घेतली असून तो जितेंद्र आव्हाडांच नाव घेत होता. याप्रकरणी मी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती, अशी माहिती महेश आहेर यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








