कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी महेंद्र कमलाकर पंडीत यांची नेमणूक झाली. तर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे याची पुण्याला समादेशक राज्य पोलीस दलाकडे बदली झाली. बुधवारी सायंकाळी गृह मंत्रालयाकडून राज्यातील पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांनी 30 सप्टेंबर 2020 मध्ये पदभर स्विकारला. जिह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेऊन गुन्हेगारी मुक्त जिल्हा करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. सराईत गुन्हेगार, संघटीत गुन्हेगारी मोडून काढली. यासाठी तडीपार, कारागृहात स्थानबध्द करण्याचे प्रस्ताव तयार करून मानचिन गुंडांच्या मुसक्या आवळल्या. शैलेश बलकवडे यांनी कोरोना आणि महापुरात मोठ्या प्रमाणात काम केले. महापुरात महामार्गावर अडकलेल्या नागरिक , ट्रक चालक याना फूड पॅकेट उपलब्द करून दिले. कोरोना काळात पोलिसांसोबतच त्यांच्या कुटुंबियांसाठी कोविड सेंटरची उभारणी केली. या काळात रस्त्यावरील फिरस्त्यांसाठी दररोज 1200 फूड पॅकेट चे वाटप केले.
गणेशोत्सव काळातही सार्वजनिक तरुण मंडळांना नवीन पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला. मंडळांनीही यास प्रतिसाद देत नवीन मार्गाचा अवलंब केला. रात्री 12 वाजता साऊड सिस्टीम बंद करण्याच्या निर्णयाचीही मंडळांनी अमलबजावणी केली. याचकाळात झालेल्या हाय व्होल्टेज असण्राया गोकुळ, राजाराम सोबतच उत्तराची पॉट निवडणूक ही अत्यंत शांततेत पार पडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन, किरीट सोमय्या यांचे कागल येथील आंदोलन अंत्यत संयमाने हाताळून जिह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवाले. चेन स्नॅचरांना पकडून महिलांचे सौभाग्य अलंकार परत केले. अशा कारवायांमुळे त्यांनी जिह्यात दबदबा निर्माण केला होता.
नुतन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत हे अहमदनगर जिल्हयातील शिन्नर येथील रहिवाशी आहेत. 2013 मध्ये ते आयपीएस झाले. 2 वर्षे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतर नांदेड येथे डीवायएसपी म्हणून सेवा बजावली. 2017 साली ते गडचिरोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. नक्षलवादी विभागात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्यांना सन्माचिन्ह प्राप्त झाले होते. 2021 पासून ते ब्रम्हमुंबई येथे स्पेशल टास्क फोर्समध्ये उप आयुक्त म्हणून सेवा बजावत होते. त्यानंतर त्यांची कोल्हापूरला अधीक्षक म्हणून बदली झाली.
800 कर्मचाऱ्यांना पदोन्नती
शैलेश बलकवडे यांनी तीन वर्षांच्या काळात सेवा जेष्टता यादी निश्चित केली. यामुळे 800 कर्मचाऱ्यांना प्रमोशनचे गिफ्ट मिळाले. याचसोबत वर्षानुवर्षे रखडले 50 कर्मचाऱ्यांचा अनुकंपचा प्रश्न मार्गी लावला. याचसोबत 236 कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती करून त्यांना अनोखे गिफ्ट दिले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









